
‘विमलकीर्ती’ नावाचे प्रथम नियतकालिक १९८४ मध्ये भुसावळ जिल्हा जळगाव येथे प्रकाशित करण्यात आले होते. हे नियतकालिक १९९८ या वर्षापर्यन्त सुरळीत चालले. परंतु आर्थिक अडचणीमुळे प्रकाशनात खंड पडला. मात्र दिनांक १३.०८.२०१० रोजी विमलकीर्ती प्रकाशनाची अधिकृत नोदणी करण्यात आली. आजपर्यंत १३० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रकाशित झालेली सर्व पुस्तके बहुजन जागृती या प्रबोधन चळवळीतील आहे. यात महात्मा जोतिराव फुले लिखित ११ पुस्तके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित १८ पुस्तके, पेरियार रामासामी लिखित ६ पुस्तके, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे लिखित १० पुस्तके, सत्यशोधक दिनकरराव जवळकर लिखित ६ पुस्तके, आदिवासींचे १० पुस्तके, संत साहित्य, स्त्री साहित्य, बहुजन महानायकांचे चरित्र साहित्य, संशोधन साहित्य व इतर साहित्य आता पर्यंत प्रकाशित केलेली आहेत.
‘विमलकीर्ती’ प्रकाशनाचा उद्देश फक्त आणी फक्त बहुजन जागृती असल्याने आम्ही उद्देशाप्रती सदैव जागृत आहोत. उच्च प्रतीचे साहित्य, दर्जेदार कागद व छपाई, उत्कृष्ट बाईडिंग तसेच रंगीत मुखपृष्ठ (कव्हर) असूनही किंमत मात्र किफायतशीर असल्याने पुस्तकांना मागणी जास्त आहे.
‘विमलकीर्ती’ प्रकाशनाचा उद्देश फक्त आणी फक्त बहुजन जागृती असल्याने आम्ही उद्देशाप्रती सदैव जागृत आहोत.